Ration Card E-Kyc Fraud Alert: रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी (E-Kyc) प्रक्रिया अत्यावश्यक आहे, मात्र ई-केवायसीच्या नावाखाली सायबर फसवणुक करणारे लोकांची फसवणूक करत आहेत. केंद्र सरकारच्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत गरीब आणि पात्र नागरिकांना मोफत रेशन दिले जाते. मात्र, अलीकडील काळात रेशन कार्ड धारकांची फसवणूक करणारे बनावट कॉल्स आणि मेसेजेस मुळे फसवणूकीचा धोका वाढला आहे.
फसवणूक करणारे कसे फसवतात?
ई-केवायसी (E-Kyc) प्रक्रियेदरम्यान, फसवणूक करणारे नागरिकांना बनावट लिंक पाठवतात किंवा फोन करून केवायसी पूर्ण करण्यास सांगतात. यामध्ये तुमच्या वैयक्तिक माहितीसह आधार क्रमांक, रेशन कार्ड डिटेल्स, बँक खात्याची माहिती घेतली जाते. फसवणूक करणारे तुम्हाला सांगतात की ई-केवायसी पूर्ण न केल्यास तुमचे रेशन कार्ड रद्द केले जाईल. त्यामुळे घाबरून बरेच नागरिक यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या फसवणुकीचे शिकार होतात.
फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या:
- फेक कॉल्स आणि मेसेजेसपासून सावध राहा:
कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका आणि वैयक्तिक माहिती शेअर करू नका. - फक्त अधिकृत केंद्रांमध्येच केवायसी प्रक्रिया पूर्ण करा:
आपल्या जवळील शासकीय रेशन दुकानात जाऊन अधिकृत डीलरमार्फत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. - ई-केवायसीसाठी ही प्रक्रिया फॉलो करा:
- शासकीय रेशन दुकानात जाऊन रेशन डीलरशी संपर्क साधा.
- डीलर तुमचा रेशन कार्ड आणि आधार क्रमांक पॉस मशीनमध्ये एंटर करतो.
- तुमच्या बोटांचे ठसे घेऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाते.
- सतर्कता बाळगा:
जर कोणी बनावट कॉल किंवा मेसेज करून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्वरित स्थानिक प्रशासनाला किंवा पोलीस स्टेशनला याबाबत माहिती द्या.
ई-केवायसी का महत्वाची आहे?
ई-केवायसी (E-Kyc) प्रक्रियेअंती तुमचे रेशन कार्ड वैध ठरते, तसेच भविष्यात सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी याची आवश्यकता असते. त्यामुळे नागरिकांनी केवायसी प्रक्रिया अधिकृत मार्गाने पूर्ण करणे गरजेचे आहे.
“फसवणूक टाळण्यासाठी सावधगिरी बाळगा आणि अधिकृत प्रक्रियेचे पालन करा. सुरक्षित रहा आणि सरकारी योजनांचा योग्य प्रकारे लाभ घ्या”.