Prajakta Mali On Suresh Dhas : अलीकडेच भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचं नाव घेत, मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. या टीकेमुळे सोशल मीडियावर प्राजक्ता माळीवर चांगलंच ट्रोलिंग सुरू झालं होतं. यावर अभिनेत्री प्राजक्ता माळीने गंभीर आक्षेप घेतला असून, तीने महिला आयोगात तक्रार करण्याचा निर्णय घेत आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर बोलताना त्यांनी प्राजक्ता माळी, सपना चौधरी आणि रश्मिका मंदाना यांची नावे घेतली. सुरेश धस यांनी यावेळी इव्हेंट मॅनेजमेंट संदर्भात बोलताना या अभिनेत्रींना जोडून अनेक दावे केले. त्यावर प्राजक्ता माळीने प्रखर आक्षेप घेतला.
तिने या प्रकरणाबद्दल महिला आयोगात तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे महिला आयोग भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर कारवाई करणार का हे पहाणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
“आकाची इथं 100 एकर जमीन आहे, तिकडे जमीन आहे, अशी माहिती समोर येत आहे. आम्ही त्यांचे सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांनी परळीला यावे. त्याचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याचा पसार करावा”, असं विधान करून त्यांनी अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती.
प्राजक्ता माळी या प्रकरणावर आता गंभीर भूमिका घेत असून, महिला आयोगात तक्रार दाखल करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. यावर महिला आयोग कोणती कारवाई करतो आणि सुरेश धस यांना यामुळे अडचणी येतात का, हे आता महिला आयोगाच्या भूमिकेवर अवलंबून आहे.