नव्या वर्षात शेतकऱ्यांना मिळणार मोठी भेट, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹5000 PM Kisan Yojana New Year Gift 5000 Rupees

PM Kisan Yojana New Year Gift 5000 Rupees

PM Kisan Yojana New Year Gift 5000 Rupees : नवीन वर्ष सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक असताना देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojana) 19व्या हप्त्यासोबत मानधन पेन्शन योजनेचा लाभ देखील पात्र शेतकऱ्यांना मिळणार असल्याची शक्यता आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकत्रितपणे ₹2000 व ₹3000 असे एकूण ₹5000 जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

PM किसान योजना आणि मानधन पेन्शन योजनेचा लाभ कसा मिळेल?
PM किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लघु व सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 दिले जातात. हे हप्ते प्रत्येक चार महिन्यांनी ₹2000 या स्वरूपात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत 18 हप्ते वितरित करण्यात आले आहेत, आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला 19वा हप्ता दिला जाणार आहे.

याशिवाय, मानधन पेन्शन योजनेचाही लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी या योजनेंतर्गत नोंदणी केलेली असावी. 60 वया नंतर पात्र शेतकऱ्यांना ₹3000 मासिक पेन्शनचा लाभ मिळतो.

कुणाला मिळेल लाभ?

  1. PM किसान सन्मान निधी लाभार्थी:
    या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच मानधन पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकतो.
  2. वयाची अट:
    18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी या योजनेत सामील होऊ शकतात.
  3. योगदान आवश्यक:
    शेतकऱ्यांनी दरमहा ₹55 ते ₹200 पर्यंतचे योगदान करणे आवश्यक आहे.

कधी जमा होणार पैसे?


सरकारने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, सुत्रांच्या माहितीनुसार, जानेवारी महिन्याच्या मध्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5000 जमा करण्याचे नियोजन सुरू आहे.

कशी करावी नोंदणी?

  • PM किसान योजनेसाठी शेतकऱ्यांनी अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी.
  • मानधन पेन्शन योजनेसाठी जवळच्या CSC सेंटरशी संपर्क साधावा.

शेतकऱ्यांसाठी मोठी संधी


शेतकऱ्यांना एकाच वेळी दोन योजनांचा लाभ मिळणे ही मोठी बाब आहे. या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.
याबाबत अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत अपडेटची प्रतीक्षा करावी.
“ही माहिती राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि किसान सन्मान निधी योजनेबद्दल जनजागृती वाढवा”!

Share This Article