Majhi Ladki Bahin Yojana Good News: डिसेंबरचा हप्ता आजपासून खात्यात जमा,1500 की 2100 रुपये?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana December Payment Credited

Majhi Ladki Bahin Yojana Good News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. नागपूर विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली होती. त्यांनी स्पष्ट केलं की, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना डिसेंबरचा सहावा हप्ता 1500 रुपयांच्या स्वरूपात मिळणार आहे. सरकारने या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होतील?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana December Payment Credited: डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यांमध्ये वर्ग केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल, तर उर्वरित अर्जांची स्क्रुटिनी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 25 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील.

2100 रुपयांसाठी वाट पाहावी लागणार

महायुती सरकारने निवडणूक प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, सध्या डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयांच्या स्वरूपातच दिला जात आहे. 2100 रुपयांच्या वाढीसाठी बजेट अधिवेशनाची प्रतीक्षा करावी लागेल. फडणवीस यांनी अर्थसंकल्पात यासंदर्भात निर्णय होईल, असं स्पष्ट केलं आहे.

या महिलांना मिळणार हप्त्याचा लाभ

  • महाराष्ट्रात राहणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना हप्त्याचा लाभ मिळणार.
  • वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिला पात्र.
  • आधार लिंक असलेलं बँक खाते आवश्यक.
  • विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांना प्राधान्य.

लाडक्या बहिणींसाठी हक्काचे 1500 रुपये

राज्यात महिला सशक्तिकरणासाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने महिलांना मोठा आधार दिला आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या महिन्याच्या अखेरीस संपूर्ण रक्कम पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती सरकारने दिली आहे.

सरकारच्या निर्णयावर लक्ष

महिलांनी 2100 रुपयांसाठी आशा धरली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील निर्णयामुळे ही अपेक्षा पूर्ण होईल का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Share This Article