Majhi Ladki Bahin Yojana New Registration Update : अदिती तटकरेंनी नवीन अर्ज प्रक्रियेबाबत दिली महत्त्वाची माहिती

Majhi Ladki Bahin Yojana New Registration Update

Majhi Ladki Bahin Yojana New Registration Update : माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वाची ठरली आहे. सहावा हप्ता खात्यावर जमा झाल्यानंतर अनेक महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करता येईल का? यावर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

15 ऑक्टोबर होती शेवटची तारीख


Majhi Ladki Bahin Yojana New User Registration: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 होती. त्या तारखेनंतर अर्ज प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. मंत्री अदिती तटकरे यांच्या मते, सुमारे 2.5 कोटी महिलांनी योजनेसाठी नोंदणी केली आहे. ही संख्या जवळपास 99 टक्के उद्दिष्ट गाठणारी आहे. (Majhi Ladki Bahin Yojana New Registration Date Was 15 October 2024).

नवीन अर्जांबाबत मंत्रिमंडळाचा निर्णय प्रलंबित


माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन अर्जांसाठी प्रक्रिया सुरू करायची का, निकष बदलायचे का, किंवा वयोमर्यादा 21 वरून 18 वर आणायची का, याबाबत अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे. 15 ऑक्टोबरनंतर आचारसंहितेमुळे हे निर्णय लांबणीवर पडले आहेत.

महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय अपेक्षित


लाडकी बहीण योजनेच्या अर्जासाठी नवी तारीख जाहीर होईल का, किंवा नवीन नियमांनुसार योजनेत बदल करण्यात येतील का, याबाबत सध्या स्पष्टता नाही. मात्र, सरकार या संदर्भात मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत चर्चा करून योग्य तो निर्णय घेईल, असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी सर्व कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे आहे. सरकारकडून नवीन अर्जांसाठीची प्रक्रिया सुरू होताच तत्काळ अर्ज करण्यासाठी महिलांनी तयार राहणे गरजेचे आहे. महिला व बालविकास मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, (Mazi Ladki Bahin Yojana New Registration) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया सुरू करण्याबाबतचा निर्णय येत्या मंत्रिमंडळ बैठकीत होण्याची शक्यता आहे.

Share This Article