Majhi Ladki Bahin Yojana Form Filling Process Update: महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्यासाठी जुलै २०२४ पासून ‘माझी लाडकी बहीण योजना’ (Mazi Ladki Bahin Yojana) सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात सहा हफ्त्यांद्वारे ९,००० रुपये जमा करण्यात आले आहेत. मात्र, अनेक महिलांना फॉर्म भरण्यात उशीर झाल्याने किंवा फॉर्मच न भरल्याने त्यांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. त्यामुळे आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया पुन्हा कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माझी लाडकी बहीण योजना नवीन अर्ज प्रक्रिया
दिवाळी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता एकत्र जमा केला. तसेच, डिसेंबर महिन्याचा हफ्ताही लाभार्थींच्या खात्यात जमा झाला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र, ज्या महिलांनी यापूर्वी अर्ज भरलेला नाही, त्यांच्यासाठी लवकरच (Majhi Ladki Bahin Yojana Registration) फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी शक्यता आहे.
अर्जासाठी पात्रता आणि महत्त्वाची अट
- योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी असावे.
- आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे.
- ज्या महिलांचे खाते आधारशी लिंक नव्हते, त्यांनाही आता पैसे मिळायला सुरुवात झाली आहे.
योजनेचे उद्दिष्ट आणि पुढील प्रक्रिया
लाडकी बहीण योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देणे आहे. योजनेसाठी अर्ज भरण्याची पुढील प्रक्रिया सरकारकडून लवकरच जाहीर केली जाईल. त्यामुळे ज्या महिलांना अद्याप या योजनेचा लाभ घेता आलेला नाही, त्यांच्यासाठी ही एक शेवटची संधी असणार आहे.