Majhi Ladki Bahin Yojana Eligibility New Criteria: महाराष्ट्र सरकारने महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने पाठवले जात आहेत. परंतु, आता योजनेच्या लाभार्थींसाठी काही नवे निकष समोर आले आहेत, ज्यामुळे काही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन
15 डिसेंबर 2024 रोजी शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत (Majhi Ladki Bahin Yojana) ‘माझी लाडकी बहीण योजना’बाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. त्यांनी स्पष्ट केले की राज्य सरकारच्या आगामी अर्थसंकल्पात या योजनेची रक्कम वाढवून 2100 रुपये करण्यात येईल. ही सुधारणा मार्च किंवा एप्रिल 2025 च्या अर्थसंकल्प सत्रात होण्याची शक्यता असून, मे किंवा जूनपासून महिलांच्या खात्यात दरमहा 2100 रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे.
माझी लाडकी बहीण योजना पात्र महिलांसाठी निकष
‘माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत खालील महिलांना लाभ दिला जाईल:
- महाराष्ट्रातील रहिवासी महिला.
- वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असलेल्या महिला.
- आधारशी लिंक केलेले बँक खाते असणे आवश्यक.
- वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, अविवाहित किंवा निराधार महिला.
- 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले आउटसोर्स, स्वैच्छिक व कंत्राटी कर्मचारी देखील पात्र.
‘या’ महिलांना मिळणार नाही लाभ
काही निकषांनुसार खालील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही:
- ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
- ज्या कुटुंबातील सदस्य नियमित/स्थायी सरकारी कर्मचारी आहेत किंवा निवृत्तीनंतर पेन्शन घेत आहेत.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सध्या किंवा माजी खासदार/आमदार आहेत.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) नोंदणीकृत आहे.
महिलांसाठी मोठी घोषणा – आवास योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसशी संबंधित आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे, केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 20 लाख घरांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा करताना स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना, बेघर महिलांना आणि शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ मिळेल.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना मिळणार हक्काचं घर! राज्य सरकारसोबतच केंद्राकडूनही मोठा दिलासा.
महिला सशक्तीकरणासाठी उपयुक्त योजना
महिला सशक्तीकरणासाठी (Mazi Ladki Bahin Yojana) ही योजना अत्यंत उपयुक्त ठरली आहे. परंतु, नवीन निकषांमुळे लाभ घेणाऱ्या महिलांची यादी लवकरच पुन्हा अपडेट होण्याची शक्यता आहे. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक स्थैर्य आणि समाजात सन्मान मिळवून देणे आहे.