Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

Majhi Ladki Bahin Yojana December Payment Update

Majhi Ladki Bahin Yojana December Payment Update:

Majhi Ladki Bahin Yojana December Installment Update: महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत पात्र महिलांना आर्थिक मदत देण्याचा उपक्रम यशस्वीरित्या सुरू आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होईल, याची उत्सुकता लाभार्थी महिलांमध्ये आहे. या संदर्भात सरकारकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार?

माझी लाडकी बहीण योजनेचा शेवटचा हप्ता ऑक्टोबरमध्ये जमा करण्यात आला होता. त्यावेळी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचा एकत्रित हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमुळे लागू होणार असलेल्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकर देण्यात आला होता.

आता निवडणुका संपल्याने आणि महायुती सरकार बहुमताने पुन्हा सत्तेत आल्याने, लाडकी बहीण योजनेचा हफ्ता पुढच्या महिन्यात देण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र सरकारने हिवाळी अधिवेशनात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी माझी लाडकी बहीण योजनेला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट केले आहे. अधिवेशन 21 डिसेंबर 2024 रोजी संपले आहे, त्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होईल.

लांबलेल्या अर्जांची तपासणी सुरू

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर होती. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या कालावधीत मोठ्या प्रमाणावर दाखल झालेल्या अर्जांची तपासणी होऊ शकली नव्हती. आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. नवीन अर्ज केलेल्या पात्र महिलांना वेळेत लाभ मिळावा, यासाठी प्रशासन सज्ज आहे.

कुणाला मिळतो लाभ?

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना दरमहा ₹1,500 ची आर्थिक मदत दिली जाते. 1 जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेचा लाभ आतापर्यंत राज्यातील 2.5 कोटींपेक्षा जास्त महिलांनी घेतला आहे.

लाभार्थींनी घ्यायची काळजी

  • आधार आणि बँक खाते माहिती अपडेट ठेवा.
  • कोणत्याही तांत्रिक समस्या असल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा.

महिला सक्षमीकरणाची दिशा ठरवणारी योजना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात केलेल्या विधानानुसार, “सरकारच्या महिलांसाठी सुरू असलेल्या कोणत्याही योजना बंद होणार नाहीत. उलट, महिलांच्या सक्षमीकरणासाठी नव्या योजना राबवल्या जातील.”

महिला सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील टप्पा यशस्वी होण्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता लवकरच जमा होईल, असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींची संक्रांत होणार अजून गोड, मकरसंक्रांतीच्या आधी मिळणार दोन महिन्यांच्या हफ्त्याचा लाभ.

Share This Article