२.४६ कोटी महिलांच्या खात्यात सहाव्या हफ्त्याचे पैसे जमा Majhi Ladki Bahin Yojana December Installment Update

Majhi Ladki Bahin Yojana December Installment Update

Majhi Ladki Bahin Yojana December Installment Update: माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी आशेचा किरण ठरली आहे. डिसेंबर महिन्यात या योजनेत मोठा बदल झाला असून, राज्यातील २.४६ कोटी महिलांच्या खात्यावर सहाव्या हफ्त्याचे पैसे जमा झाले आहेत. विशेष म्हणजे, यावेळी १२ लाख नवीन महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, ज्यामुळे लाभार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.

सहाव्या हफ्त्याचे वितरण पूर्ण


डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यावर (Majhi Ladki Bahin Yojana Payment) सहाव्या हफ्त्याचे पैसे जमा केले. प्रत्येक लाभार्थ्य महिलेला १५०० रुपये प्रति महिना याप्रमाणे जुलैपासून सहा महिन्यांसाठी ९,००० रुपये मिळाले आहेत. यासाठी राज्य सरकारने ३,६८९ कोटी रुपयांचे वितरण केले आहे.

१२ लाख नवीन अर्ज मंजूर


डिसेंबर महिन्यात आधार कार्ड लिंक नसलेल्या १२ लाख अर्जांची यादी मंजूर करण्यात आली. त्यामुळे आता एकूण २.४६ कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळतोय. नोव्हेंबरपर्यंत ही संख्या २.३४ कोटी होती.

महिलांमध्ये आनंदाचे वातावरण


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हफ्ता (Mazi Ladki Bahin Yojana 6th Installment) जमा झाल्याने अनेक महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांना या योजनेमुळे मोठा आधार मिळत आहे.

महिला सरकारच्या नव्या घोषणेच्या प्रतीक्षेत


महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. राज्यातील महिलांना या घोषणेची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, अशी अपेक्षा आहे.


माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी एक महत्त्वाची पाऊल आहे. जुलैपासून आतापर्यंत या योजनेतून २१,६०० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

Share This Article