Majhi Ladki Bahin Yojana: डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

Majhi Ladki Bahin Yojana December Installment Update

Majhi Ladki Bahin Yojana December Installment Update: महाराष्ट्रात लागू असलेल्या माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत महिलांना आर्थिक मदत देण्याचा कार्यक्रम सुरूच राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या सत्रात याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.


योजनेची सुरूवात आणि आतापर्यंतचे हफ्ते


१ जुलै २०२४ पासून सुरू झालेल्या माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा राज्यातील २.५ कोटींहून अधिक महिलांना झाला आहे. आतापर्यंत या योजनेतून ५ हफ्त्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात पाठविण्यात आले आहेत. दरमहा १५०० रुपये देण्यात येणाऱ्या या योजनेचा, डिसेंबर महिन्याचा हफ्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.


डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याची तारीख


मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. योजनेचे नियम देखील बदललेले नाहीत. डिसेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हफ्ता चालू सत्र संपल्यानंतर लगेच जमा केला जाईल.”


२१०० रुपयांच्या वाढीव रकमेबाबत


महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सध्या महिलांना १५०० रुपये मिळणार आहेत. २१०० रुपये देण्याचा निर्णय आगामी अर्थसंकल्पानंतर घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.


आर्थिक तरतूद आणि पुढील योजना


माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने १४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे महिलांना पुढील हफ्ते वेळेत मिळत राहतील, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींची संक्रांत होणार अजून गोड, मकरसंक्रांतीच्या आधी मिळणार दोन महिन्यांच्या हफ्त्याचा लाभ.


महिलांना मोठा दिलासा


राज्य सरकारच्या या घोषणेमुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील काही महिन्यांत योजनेच्या वाढीव रकमेबाबत सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे.

Share This Article