महाराष्ट्र सरकारने जाहीर केली २०२५ ची सार्वजनिक सुट्ट्यांची यादी; २४ अधिकृत सुट्ट्यांसह ‘ही’ विशेष सुट्टी मिळणार! Maharashtra Public Holidays 2025

Maharashtra Public Holiday List 2025

Maharashtra Public Holidays 2025: नवीन वर्षाचे कॅलेंडर आल्यानंतर पहिली उत्सुकता असते ती म्हणजे सार्वजनिक सुट्ट्यांची यादी पाहण्याची. महाराष्ट्र सरकारने २०२५ साठीच्या सरकारी सुट्ट्यांची अधिकृत घोषणा केली आहे. या यादीत (Maharashtra Holiday List 2025) एकूण २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या असून काही सण रविवारी येणार असल्याने त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांवर होऊ शकतो.

२४ सार्वजनिक सुट्ट्यांची यादी


Holiday List 2025 : महाराष्ट्र सरकारने १८८१ च्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम २५ अंतर्गत जाहीर केलेल्या या सुट्ट्या सरकारी कर्मचारी आणि विविध संस्थांसाठी लागू आहेत. याशिवाय, २३ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार) या दिवशी भाऊबीज निमित्ताने राज्यातील काही संस्थांसाठी विशेष सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या सार्वजनिक सुट्ट्या २०२५:

  1. प्रजासत्ताक दिन: २६ जानेवारी २०२५ (रविवार)
  2. गुढीपाडवा: ३० मार्च २०२५ (रविवार)
  3. रमजान ईद: ३१ मार्च २०२५ (सोमवार)
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: १४ एप्रिल २०२५ (सोमवार)
  5. गणेश चतुर्थी: २७ ऑगस्ट २०२५ (बुधवार)
  6. दसरा: २ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार)
  7. दिवाळी (लक्ष्मीपूजन): २१ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार)
  8. ख्रिसमस: २५ डिसेंबर २०२५ (बुधवार)

२०२५ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची संपूर्ण यादी

क्रमांक सुट्टी तारीख वार
प्रजासत्ताक दिन२६ जानेवारी २०२५रविवार
छत्रपती शिवाजी महाराज जयंती१९ फेब्रुवारी २०२५गुरुवार
महाशिवरात्री२६ फेब्रुवारी २०२५बुधवार
होळी (दुसरा दिवस)१४ मार्च २०२५शुक्रवार
गुढीपाडवा३० मार्च २०२५रविवार
रमजान-ईद३१ मार्च २०२५सोमवार
राम नवमी६ एप्रिल २०२५रविवार
महावीर जन्मकल्याणक१० एप्रिल २०२५गुरुवार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती१४ एप्रिल २०२५सोमवार
१०गुड फ्रायडे१८ एप्रिल २०२५शुक्रवार
११महाराष्ट्र दिन१ मे २०२५गुरुवार
१२बुद्ध पौर्णिमा१२ मे २०२५सोमवार
१३बकरी ईद७ जून २०२५शनिवार
१४मोहरम६ जुलै २०२५रविवार
१५स्वातंत्र्य दिन१५ ऑगस्ट २०२५शुक्रवार
१६पारसी नववर्ष१५ ऑगस्ट २०२५शुक्रवार
१७गणेश चतुर्थी२७ ऑगस्ट २०२५बुधवार
१८ईद-ए-मिलाद५ सप्टेंबर २०२५शुक्रवार
१९महात्मा गांधी जयंती२ ऑक्टोबर २०२५गुरुवार
२०दसरा२ ऑक्टोबर २०२५गुरुवार
२१दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन)२१ ऑक्टोबर २०२५मंगळवार
२२दिवाळी (बलिप्रतिपदा)२२ ऑक्टोबर २०२५बुधवार
२३गुरु नानक जयंती५ नोव्हेंबर २०२५बुधवार
२४ख्रिसमस२५ डिसेंबर २०२५बुधवार

विशेष सुट्टी कोणासाठी?


२३ ऑक्टोबर २०२५ रोजी भाऊबीजच्या दिवशी राज्यातील सरकारी कार्यालये, महानगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायती, आणि इतर स्थानिक संस्थांसाठी अतिरिक्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

रविवारी येणारे महत्त्वाचे सण:


२०२५ मध्ये काही सण रविवारी आल्याने त्या दिवशीच्या सुट्ट्या बुडणार आहेत. यामध्ये प्रजासत्ताक दिन, गुढीपाडवा, राम नवमी, आणि मोहरम यांचा समावेश आहे.

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती:


List Of Holidays 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांना २४ सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त अधिकृतपणे भाऊबीजसारख्या काही विशेष दिवसांसाठी अतिरिक्त सुट्टीचा लाभ मिळणार आहे. तसेच, बँकांसाठी १ एप्रिल २०२५ रोजी स्वतंत्र सुट्टी जाहीर करण्यात आली असून ती सरकारी कार्यालयांना लागू नाही.

Share This Article