मधुमक्षिकापालकांसाठी महत्वाची बातमी: मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करा आणि मिळवा विविध योजनांचा लाभ Madhmashi Palan Yojana Maharashtra

Madhmashi Palan Yojana Maharashtra Madhukranti Portal Registration Benefits

Madhmashi Palan Yojana Maharashtra: मधमाशीपालन हे केवळ व्यवसाय म्हणूनच नाही तर पर्यावरणाच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्वाचे आहे. पिकांच्या परागीकरणात मधमाशांची भूमिका मोठी असते, ज्यामुळे उत्पादनात वाढ होते. याशिवाय, मधाचे वेगळेच आयुर्वेदिक फायदे देखील आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘मधुक्रांती पोर्टल’ सुरू केले आहे, ज्याद्वारे मधुमक्षिकापालकांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवता येईल.

राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व Honey Mission मध अभियान

राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांना राष्ट्रीय मधुमक्षिकापालन आणि मध अभियान राबविण्याची मान्यता प्राप्त झाली आहे. यासाठी राज्य सरकारने एक ऑनलाइन पोर्टल, ‘मधुक्रांती पोर्टल’ तयार केले आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना नोंदणी करण्याची सुविधा दिली आहे.

मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी केल्याने मिळणारे फायदे

  • नोंदणी आणि ओळख: नोंदणीकृत मधुमक्षिकापालकांना अधिकृत ओळख मिळते.
  • विमा संरक्षण: १ लाख रुपयांपर्यंत फ्री विमा.
  • मधुमक्षिकापेट्यांचे स्थलांतर: नोंदणीकृत पालकांना मधुमक्षिका पेट्यांचे स्थलांतर करण्यात अडथळे येत नाहीत.

नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड (नाव, जन्मतारीख, पत्ता)
  • अद्यावत मोबाईल क्रमांक (आधाराशी जोडलेला)
  • मधुमक्षिकापालना संबंधित तपशील
  • मधुमक्षिकापालन प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • मधुमक्षिका पेट्यांसह फोटो

नोंदणी शुल्क

फ्रेम्सनोंदणी शुल्क
१० ते १०० फ्रेम₹२५०
१०१ ते २५० फ्रेम₹५००
२५१ ते ५०० फ्रेम₹१,०००
५०१ ते १,००० फ्रेम₹२,०००
१,००१ ते २,००० फ्रेम₹१०,०००
२,००१ ते ५,००० फ्रेम₹२५,०००
५,००१ ते १०,००० फ्रेम₹१,००,०००
१०,००० पेक्षा अधिक फ्रेम₹२,००,०००

नोंदणीबद्दल अधिक माहिती आणि सहाय्यासाठी संपर्क करा:

  • राष्ट्रीय मधमाशी मंडळ, नवी दिल्ली: (०११) २३३२५२६५ / २३७१९०२५
  • मधुक्रांती पोर्टल Tech Support: १८००१०२५०२६
  • महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे: (०२०) २९७०३२२८

नोंदणी करण्यासाठी वेबसाईट: मधुक्रांती पोर्टल.

Share This Article