भूमिहीनांना १००% अनुदानावर मिळणार शेती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या Bhumihin Yojana Maharashtra 2024

Karmaveer Dadasaheb Gaikwad Swabhiman Yojana

Karmaveer Dadasaheb Gaikwad Swabhiman Yojana: महाराष्ट्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत भूमिहीन शेतमजुरांसाठी राबवली जाणारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध घटकातील नागरिकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी महत्त्वाची आहे.

Bhumihin Yojana Maharashtra 2024: योजनेचा मुख्य उद्देश

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील भूमिहीन शेतमजुरांना १००% अनुदानावर शेतजमीन देऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यासोबतच कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम

  • ४ एकर जिरायत जमिनीकरिता: प्रतिएकर ५ लाख रुपये
  • २ एकर बागायत जमिनीकरिता: प्रतिएकर ८ लाख रुपये

पात्रता निकष

  • अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील भूमिहीन शेतमजूर असावा.
  • वयोमर्यादा: १८ ते ६० वर्षे.
  • प्राधान्य: महिलांना, विधवा महिलांना, अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अत्याचारग्रस्त व्यक्तींना प्राधान्य.

लाभार्थ्यांना मिळणारे फायदे

  • २ एकर बागायत किंवा ४ एकर जिरायत जमीन.
  • शंभर टक्के अनुदान स्वरूपात जमीन खरेदी.

अर्ज प्रक्रिया

  1. विहित नमुन्यातील अर्ज भरावा.
  2. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित सहायक समाज कल्याण आयुक्त कार्यालय येथे जमा करावा.
  3. जिल्ह्यातील इच्छुक शेतमालकांशी संपर्क साधून शेती खरेदी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

आवश्यक कागदपत्रे

  • जातिचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • वयाचा पुरावा
  • भूमिहीन असल्याचे प्रमाणपत्र

Sc Caste Yojana In Maharashtra In Marathi: अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना ही भूमिहीनांसाठी आर्थिक स्वावलंबनाची संधी आहे. तुम्ही जर पात्र असाल तर ही सुवर्णसंधी गमावू नका!

Share This Article