Bank Aadhar Link Status Check Online: आधार नंबर हा भारतातील अनेक शासकीय योजनांसाठी (Government Schemes) आणि आर्थिक व्यवहारांसाठी महत्त्वाचा झाला आहे. विशेषतः सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी बँक खात्यात योजनांचे पैसे जमा होण्यासाठी आधार लिंकिंग आवश्यक आहे. परंतु, अनेकांना आपला आधार नंबर कुठल्या बँकेला लिंक आहे, हे तपासण्याची प्रक्रिया माहित नसते. येथे आपण आधार-बँक लिंकिंग स्थिती कशी तपासायची याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
तुमचा आधार नंबर कोणत्या बँकेला लिंक आहे? अशा प्रकारे तपासा:
- एनपीसीआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या:
- सर्वप्रथम Google वर https://www.npci.org.in/ ही वेबसाईट ओपन करा.
- Consumer पर्याय निवडा:
- मुख्य पेजवर ‘Consumer’ या पर्यायावर क्लिक करा.
- Bharat Aadhaar Seeding Enabler (BASE) निवडा:
- तुम्हाला BASE नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- Aadhaar Mapped Status तपासा:
- नवीन पेजवर डाव्या बाजूला असलेल्या मेनूवर क्लिक करा.
- येथे तुम्हाला ‘Aadhaar Mapped Status’ हा पर्याय निवडायचा आहे.
- तपशील भरा:
- तिन्ही बॉक्समध्ये तुमचा आधार नंबर व्यवस्थित भरा.
- खाली दिलेला कॅप्चा कोड भरा.
- आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाका.
- ‘Check Status’ बटणावर क्लिक करा.
- तुमच्या लिंकिंग स्टेटसची माहिती मिळवा:
- स्क्रीनवर तुमचा आधार नंबर आणि लिंकिंग स्टेटसची माहिती दिसेल.
- यामध्ये तुम्हाला ज्या बँकेला आधार लिंक आहे, ती माहिती स्पष्टपणे पाहायला मिळेल.
आधार लिंकिंग का महत्त्वाचे आहे?
राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचे पैसे थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी आधार नंबर बँकेला लिंक असणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी आपले आधार नंबर वेळेवर लिंक करणे गरजेचे आहे.
तुमचा आधार नंबर ज्या बँकेला लिंक आहे, ते तपासण्याची ही सोपी आणि जलद प्रक्रिया आहे. वरील स्टेप्सचा वापर करून तुम्ही सहजपणे तुमचे आधार-बँक लिंकिंग स्थिती तपासू शकता.