Maharashtra Hair Fall News: महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांमध्ये अलीकडेच ‘टकला व्हायरस’ (Takla Virus in Maharashtra) नावाने ओळखले जाणारे एक विचित्र आणि गंभीर आरोग्य संकट उदभवले आहे. कलवड, बोंडगाव, हिंगणा या गावांमध्ये सुमारे 150 लोकांचे अचानक केस गळून टक्कल पडल्याची घटना घडली आहे.
कशामुळे होत आहे अचानक केसगळती?
टकला व्हायरल (Baldness Virus) या रहस्यमय आजाराची सुरुवात खाज सूटण्यापासून होते, ज्यामुळे लगेचच केस गळण्यास सुरुवात होते. काही लोकांच्या मते, हलकस ओढल्यानंतरही मोठ्या प्रमाणात केस निघून हातात येतात, या आजाराला घाबरून काही लोकांनी डोक पूर्णपणे मुंडण करून घेतल आहे.
प्रशासनाची तातडीची पावले
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य अधिकारी पाण्याचे नमुने आणि स्काल्प बायोप्सी घेत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, यामागे कवक संसर्ग (Fungal Infection) असण्याची शक्यता आहे.
स्काल्पची योग्य काळजी कशी घ्याल?
केसगळती रोखण्यासाठी तज्ञांनी दिलेल्या काही महत्त्वाच्या टिप्स:
- केस कमी धुवा: आठवड्यातून 2-3 वेळा केस धुणे योग्य ठरते.
- स्काल्प स्क्रब वापरा: स्काल्पवरील मृत पेशी आणि घाण काढण्यासाठी महिन्यातून एकदा स्क्रब करा.
- *मालिश करा: रक्ताभिसरण सुधारण्यासाठी नियमित मालिश करा.
- भरपूर पाणी प्या: स्काल्प हायड्रेट राहण्यासाठी भरपूर पाणी प्या.
- सॉफ्ट प्रोडक्ट वापरा: सल्फेट-मुक्त शॅम्पू निवडा आणि कठोर रसायनांपासून दूर राहा.
- सूर्यप्रकाशापासून संरक्षण: बाहेर जाताना डोक्यावर स्कार्फ किंवा टोपी वापरा.
- स्काल्प ट्रीटमेंट्स करा: कोरडेपणा किंवा खाजल्यावर योग्य सीरम किंवा ट्रीटमेंट वापरा.
केसगळतीपासून संरक्षणासाठी स्काल्प स्वच्छता कशी राखावी?
- प्रथम गरम पाण्याने धुवा: केस गरम पाण्याने धुवा.
- सॉफ्ट शॅम्पू निवडा: स्काल्पसाठी सौम्य शॅम्पू वापरा आणि त्याचा थेट स्काल्पवर प्रभाव होऊ नये यासाठी तो पाण्यात मिसळा आणि त्यानंतर डोक्याला लावा.
- नखे नाही, बोटांनी मालिश करा: स्काल्पवर हळूवारपणे 3 मिनिटे मालिश करा.
- योग्य रीतीने धुवा: उरलेला शॅम्पू स्काल्पवर राहणार नाही याची खात्री करा.
- एक्सफोलिएट करा: महिन्यातून एकदा स्काल्प स्क्रब वापरा.
- कंडिशनर लावा: केसांना हायड्रेट करण्यासाठी योग्य कंडिशनर वापरा.
- शेवटी थंड पाण्याने धुवा: शेवटी केस थंड पाण्याने धुवा.
आरोग्य यंत्रणेकडून पुढील उपाययोजना
या विचित्र परिस्थितीवर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा स्थानिकांना सतर्क राहण्याच आवाहन करत आहे. ग्रामीण भागात वेगाने आरोग्य सेवा पुरवण्याच महत्त्व यामुळे अधोरेखित झाल आहे.
महाराष्ट्रातील या ‘टक्कल व्हायरस’ प्रकरणाने केसगळतीच संकट निर्माण केल आहे. या काळात योग्य स्काल्प काळजी आणि अधिकृत माहितीसोबत राहणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि घाबरून चुकीची पावले उचलू नका.