Ayushman Card Eligibility Check 2025: आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाते, ज्यामध्ये पात्र नागरिकांना सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळतात. मात्र, आयुष्मान कार्ड बनवण्याआधी पात्रता तपासणे गरजेचे आहे. येथे आपण आयुष्मान कार्डसाठी पात्रता कशी तपासायची याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
आयुष्मान कार्ड पात्रता तपासण्यासाठी:
पहिली स्टेप:
- अधिकृत वेबसाइट https://pmjay.gov.in वर जा.
- ‘Am I Eligible’ या पर्यायावर क्लिक करा.
दुसरी स्टेप:
- आपला 10 अंकी मोबाईल नंबर टाका आणि आलेला OTP प्रविष्ट करा.
- कॅप्चा कोड भरा आणि लॉगिन करा.
- राज्य आणि जिल्हा निवडा.
तिसरी स्टेप:
- कागदपत्र निवडा (आधार कार्ड किंवा इतर).
- आधार क्रमांक टाका आणि ‘सर्च’ वर क्लिक करा.
- तुमची पात्रता स्क्रीनवर दाखवली जाईल.
आयुष्मान कार्डचे फायदे:
- सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये मोफत उपचार.
- दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्च.
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विशेष लाभ.
आयुष्मान भारत योजनेसाठी (Ayushman Bharat Yojana) तुम्ही पात्र आहात कि नाही हे जाणून घेण्यासाठी वर सांगितलेल्या पद्धतीने तुमची पात्रता तपासा आणि जर तुम्ही पात्र असाल तर आजच तुमचे आयुष्मान कार्ड (Ayushman Card) बनवून घ्या.