स्थानिक स्वराज्य निवडणुका 3 ते 4 महिन्यांत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Local Body Elections Maharashtra 2025 Date

Local Body Elections Maharashtra 2025 Date

Local Body Elections Maharashtra 2025 Date : शिर्डीत आज भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील 3 ते 4 महिन्यांत होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ओबीसी आरक्षणासंबंधी न्यायालयाच्या निर्णयावर निवडणुकीची वेळ निश्चित होणार आहे. फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. “नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयारी करा; विधानसभा निवडणुकीतील विजयावर समाधान मानून बसू नका,” असेही ते म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही शिर्डीत आयोजित या पक्ष अधिवेशनाला हजेरी लावली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर भाजपची ही पहिली राज्य कार्यकारिणीची बैठक आहे.

Share This Article