‘टकला व्हायरस’ कसा होतो? नागरिकांनी काय काळजी घ्यावी, जाणून घ्या सविस्तर Takla Virus Maharashtra Buldhana Hair Loss Disease

Takla Virus Maharashtra Buldhana Hair Loss Disease

Buldhana Virus News | बुलढाणा जिल्ह्यात ‘टकला’ व्हायरसची दहशत


Maharashtra Bald Virus: महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात ‘टकला व्हायरस’ने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. या अनोख्या आजारामुळे फक्त तीन दिवसांत लोकांचे सगळे केस गळून लोक पूर्ण टकले होत आहेत. शेगाव तालुक्यातील १५ गावांमध्ये या व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती मिळाली आहे.

टकला व्हायरस संक्रमित गावांची यादी:


टकला व्हायरस आजारामुळे हिंगणा, बॉंडगाव, भोता, पाहुर पूर्णा आणि इतर काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक प्रभावित झाले आहेत. गेल्या १०-१२ दिवसांत या व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, स्थानिक लोक भयभीत झाले आहेत.

‘टकला व्हायरस’ कसा होतो?


Maharashtra Bald Virus Name: या आजाराला ‘टकला व्हायरस’ असे नाव देण्यात आले आहे. (Maharashtra bald virus symptoms) यामध्ये डोक्याला खाज सुटते, त्यानंतर केस गळायला लागतात आणि अर्ध्या आठवड्याच्या आत संपूर्ण डोक टकल होत. काही प्रकरणांमध्ये केस सहजपणे हाताने काढता येतात. या आजाराने लहान मुल, वृद्ध आणि महिलांनाही ग्रस्त केले आहे.

आरोग्य विभाग सतर्क:


Maharashtra bald virus treatment: या अनोख्या आजारामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून, प्रभावित गावांमध्ये सर्वेक्षण सुरू केले आहे. स्थानिक पाण्याचे नमुने गोळा करून ते तपासण्यासाठी पाठवले जात आहेत, कारण पाणीप्रदूषणामुळे हा आजार पसरत असल्याचा अंदाज आहे.

🔥 लेटेस्ट अपडेट 👉 टकला व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज, आयसीएमआरच्या अहवालाची प्रतीक्षा.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?


maharashtra bald virus home remedies: आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना स्वच्छता पाळण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कोणतेही लक्षण आढळल्यास तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल व्हावे.

🔥 हेही वाचा 👉 महाराष्ट्रात ‘टकला’ व्हायरसचा धुमाकूळ, फक्त ३च दिवसात होतायत लोक टकले!.

Share This Article