महाराष्ट्रात ‘टकला’ व्हायरसचा धुमाकूळ, फक्त ३च दिवसात होतायत लोक टकले! Takla Virus In Maharashtra

Takla Virus In Maharashtra

Takla Virus In Maharashtra : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात ‘टकला’ व्हायरसने (Takla Virus) धास्ती निर्माण केली आहे. हा व्हायरस इतका धोकादायक आहे की, लोक ३ दिवसांत पूर्णपणे टकले झाले आहेत. (Maharashtra bald virus) या व्हायरसच्या प्रकोपामुळे जिल्ह्यातील नागरिक चिंतेत पडले आहेत आणि त्यावर तातडीने उपचार करण्याची मागणी करत आहेत.

देशभरात HMPV व्हायरसने धास्ती निर्माण केली असताना, आता बुलढाणा जिल्ह्यात ‘टकला’ व्हायरसने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. ‘टकला व्हायरस’, (Takla Virus) या आजारामुळे लोकांच्या डोक्याचे ३ दिवसांत पूर्णपणे टक्कल पडत आहे, महाराष्ट्रात टकला व्हायरस चा प्रकोप झपाट्याने वाढत आहे.

Takla virus in maharashtra symptoms
Takla virus in maharashtra symptoms

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्थात, या आजरामध्ये केसे गळणे इतके गंभीर आहे की, अनेक गावांमध्ये हा आजार पसरल्याची माहिती समोर येत आहे. शेजगाव तालुक्यातील १५ गावांत या व्हायरसने हजेरी लावली आहे, ज्यामध्ये हिंगणा, बॉंडगाव, भोता, आणि पहुर पुर्णा अशी अनेक गावे आहेत.

Takla virus in maharashtra cases: रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, या व्हायरसचा एक लक्षण असे सांगितले जात आहे की, (Takla virus in maharashtra symptoms) सुरवातीला डोक्याच्या त्वचेवर खाज सुटते आणि नंतर लगेच केस गळू लागतात. आणि 4 दिवसात संपूर्ण डोक टाकल होऊन जात. तर हा आजार होताच काही लोकांचे केस हाताने ओढून सहज काढता येतात. या आजाराने लहान मुल, वृद्ध आणि महिलांनाही ग्रासल आहे.

आरोग्य विभागाने या प्रकरणाची गंभीरता ओळखून तातडीने सर्वेक्षण सुरू केले आहे आणि प्रभावित गावांतील पाणी तपासण्यासाठी तपासणी सुरू केली आहे. आरोग्य अधिकारी पाणी नमुने गोळा करत आहेत.

🔥 हेही वाचा 👉‘टकला व्हायरस’ कसा होतो? नागरिकांनी काय काळजी घ्यावी, जाणून घ्या सविस्तर.

सर्व संशयित रुग्णांची सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये तपासणी केली जात आहे.

Share This Article