Majhi Ladki Bahin Yojana Payment Status Check Online : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर झाल्यानंतरही अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाही. आधार कार्ड आणि बँक खात्याच्या सीडिंगमध्ये अडचणी येत असल्याने असे प्रकार घडत आहेत. अशा महिलांनी वेळेत त्यांच पेमेंट स्टेट्स कस चेक करायच? त्याची प्रक्रिया जाणून घ्या आणि योजनेचा लाभ मिळवा.
Contents
महिलांना का येत आहेत अडचणी?
- अनेक महिलांचे बँक खाते त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक नसल्यामुळे योजनेची रक्कम खात्यात जमा होत नाही.
- अर्ज करताना चुकीचे किंवा आधारशी लिंक नसलेले बँक खाते दिल्यामुळे रक्कम दुसऱ्या खात्यात वर्ग झाल्याचे समोर येत आहे.
बँक खाते आधारशी लिंक आहे कि नाही कसे तपासावे?
- My Aadhaar संकेतस्थळाला भेट द्या.
- तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा.
- ‘आधार सिडिंग स्टेटस’ या पर्यायावर क्लिक करा.
- आधार कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे हे तपासा.
- संबंधित बँकेत पैसे आले आहेत का त्याची खात्री करा.
आधार-बँक खाते लिंक करण्याची प्रक्रिया
- आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याशी लिंक नसल्यास तातडीने तुमच्या बँकेशी संपर्क साधा.
- बँकेत जाऊन आधार लिंक करण्यासाठी अर्ज भरा आणि दोन दिवसांनी त्याचे स्टेटस तपासा.
पैसे कधी जमा होणार?
- बँक खाते आधारशी लिंक झाल्यानंतरच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो.
- आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण करूनही पैसे न मिळाल्यास 181 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा.
महत्त्वाचे
- अर्ज करताना आधारशी लिंक असलेला खाते नंबरच द्या.
- आधार आणि बँक खात्याला असलेले नाव जुळणे अत्यावश्यक आहे.
- वेळीच स्टेटस तपासा आणि बँक आधार लिंक असल्याची खात्री करा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra) योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वेळेत योग्य ती पावले उचलून तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे मिळवू शकता.