लाडकी बहिण योजनेसाठी पैशांची कशी करणार सोय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला खुलासा Majhi Ladki Bahin Yojana Funding Devendra Fadnavis Decision

Majhi Ladki Bahin Yojana Funding Devendra Fadnavis Decision

Majhi Ladki Bahin Yojana Funding Devendra Fadnavis Decision : महाराष्ट्र सरकारने ५ डिसेंबर २०२४ रोजी महायुती सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांची कार्ययोजना तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या रोडमॅपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra CM Devendra Fadnavis) यांनी विविध विभागांचा आढावा घेतला असून, त्यात खास लक्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) आणि बजेट व्यवस्थापनावर दिलं जात आहे. विशेषतः, लाडकी बहिण योजना राबविण्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक तरतूद लवकरच केली जाणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी विशेष महत्त्वाची आहे. या योजनेसाठी आवश्यक असलेल्या निधीची व्यवस्था करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी विविध विभागांच्या बजेटमध्ये आवश्यक ती कपात करण्याची योजना आखली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर ताण न येता, महिला सक्षमीकरणाच्या या महत्वाकांक्षी योजनेला योग्यरित्या निधी मिळेल, असा विश्वास आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे आहे की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेने’ महायुती सरकारच्या विजयात एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदतीसाठी एक मजबूत आधार मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मंत्रालयांच्या प्रमुखांसोबत बैठका घेऊन त्यांची बजेट आणि योजना समजून घेतल्या आहेत. यामध्ये परिवहन, पोर्ट, नागरी विमान वाहतूक, ग्रामविकास, अन्न आणि वस्त्र उद्योग विभाग यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुका (Municipal Corporation Election 2025) मार्च-एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणुकींचे सुद्धा १०० दिवसांच्या कार्ययोजनेत महत्त्व असणार आहे. लाडकी बहिण योजना आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी योग्य आर्थिक नियोजन करण्यात येणार आहे.

Share This Article