Majhi Ladki Bahin Yojana New Year 2025 Update: महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) महिला लाभार्थींमध्ये खूप लोकप्रिय ठरली आहे. डिसेंबर महिन्यातील हप्त्याचे वितरण पूर्ण झाले असून आतापर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे १५०० रुपये जमा झाले आहेत. मात्र, 2025 या नवीन वर्षात महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१०० रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२१०० रुपये कधी मिळणार?
महायुती सरकारने महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, लगेचच ही रक्कम वाढवणे कठीण असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये पैसे वाढवून देण्याची शक्यता कमी आहे. मात्र, मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना दरमहा २१०० रुपये मिळू शकतात.
डिसेंबर हप्त्याचे वितरण पूर्ण
ज्या महिलांचे आधार आणि बँक खाते लिंक आहे त्यांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत आतापर्यंत सहा हप्ते जमा करण्यात आले आहेत. ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात अर्ज भरले होते त्यांना सध्या ९००० रुपये मिळाले आहेत.
महिलांसाठी महत्त्वाची सूचना
नवीन वर्षात लाडकी बहीण योजनेचा (Majhi Ladki Bahin Yojana 2025) लाभ घेण्यासाठी महिलांनी आपले आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यांचे लिंकिंग प्रलंबित आहे, त्यांनी त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करावी. मार्च किंवा एप्रिल महिन्यात २१०० रुपये मिळण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांनी थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. महिलांना आर्थिक मदत देणाऱ्या या योजनेमुळे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्थैर्यात सुधारणा होत आहे.