Ayushman Bharat Yojana Registration Guide : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) ही समाजातील असुरक्षित घटकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आरोग्य योजना आहे. ही योजना 70 वर्षांवरील नागरिकांना वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा कवच प्रदान करते. मात्र, अनेक नागरिकांना या योजनेबाबत नोंदणी प्रक्रियेची पुरेशी माहिती नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. चला तर मग, ‘आयुष्मान भारत’ योजनेसाठी नोंदणी कशी करावी ते जाणून घेऊयात.
आयुष्मान भारत योजनेचे फायदे:
- मोफत आरोग्य विमा: वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा.
- कोणत्याही उत्पन्न मर्यादेची अट नाही: या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न मर्यादा लागू नाही.
- प्रत्येकासाठी मोफत उपचार सहज उपलब्ध: नोंदणीकृत नागरिकांना सहजपणे मोफत उपचाराचा लाभ मिळतो.
आयुष्मान भारत योजना नोंदणी प्रक्रिया:
- अॅप डाऊनलोड करा:
गुगल प्ले स्टोअरवरून किंवा आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाइटवरून अॅप डाऊनलोड करा.
- अॅपमध्ये आपली भाषा निवडा आणि पुढे जा.
- लॉगिन प्रक्रिया:
- मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा.
- मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी (OTP) टाका आणि खात्यात प्रवेश करा.
- आधार क्रमांक प्रविष्ट करा:
- आधार क्रमांक टाकून नोंदणीकृत मोबाईलवर आलेल्या ओटीपीने प्रमाणीकरण करा.
- तुमचे निवासस्थान, राज्य, शहर आणि पिन कोड यासारख्या तपशीलांची नोंद करा.
- नाव तपासा:
- नाव आधीच नोंदणीकृत आहे का हे तपासा.
- नाव आधीच नोंद नसल्यास नव्याने नावनोंदणी करा.
- पडताळणी व फोटो प्रक्रिया:
- लाईव्ह फोटो क्लिक करा आणि तो अपलोड करा.
- मोबाईल नंबर, पत्ता आणि इतर तपशील पुन्हा पडताळून सबमिट करा.
- आयुष्मान कार्ड जारी:
- सर्व तपशील तपासून तुमचा मंजूर झाल्यावर तुमचे आयुष्मान कार्ड जारी केले जाईल.
- हे कार्ड जपून ठेवा, कारण या कार्डद्वारे तुम्हाला योजनेचा लाभ घेता येतो.
महत्त्वाची सूचना:
- या योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करताना सर्व माहिती योग्य प्रकारे भरा.
- आयुष्मान कार्ड हे आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठीही खूप फायदेशीर आहे.
🔴 हेही वाचा 👉 आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना ५०,००० रुपयांचे प्रोत्साहन अनुदान: जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि निकष.