Majhi Ladki Bahin Yojana Might End Vinayak Raut Statement: महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) फार काळ सुरू राहणार नाही.
माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता जाहीर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याचे आदेश दिले. आणि पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचे पैसे जमा करण्यात आले. मात्र, विनायक राऊत यांनी राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करत, “महाराष्ट्र कर्जात बुडाला आहे, त्यामुळे सरकारला आता लाडकी बहीण योजना चालवणे कठीण होईल,” असे विधान केले आहे.
महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर योजना बंद?
विनायक राऊत म्हणाले की, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपर्यंत सरकार ही योजना सुरू ठेवेल. मात्र, त्यानंतर ही योजना बंद होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
राजकीय आरोप आणि उत्तर
राऊत पुढे म्हणाले की, “अर्थव्यवस्था सांभाळण्याचं मोठं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर आहे. सध्याच्या स्थितीत सरकारला राज्यातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे वेतनही वेळेवर देता येत नाही.”
सरकारचा डोलारा टिकवणे आव्हानात्मक
राऊत यांच्या मते, ‘लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या खर्चाची असून, राज्य सरकारला हा आर्थिक डोलारा सांभाळणे कठीण जात आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनीही सरकारला धारेवर धरले आहे.
नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि राजकीय उलथापालथ
या वक्तव्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. “लाडकी बहीण योजना बंद झाली तर गरीब महिलांना मोठा फटका बसेल,” असे नागरिकांचे म्हणणे आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या या पार्श्वभूमीवर, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Majhi Ladki Bahin Yojana) किती काळ सुरु राहते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
विनायक राऊत यांच्या विधानाने महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. लाडकी बहीण योजनेचा खरोखरच शेवट होणार का, की पुढील निवडणुकांपर्यंत ही योजना फक्त राजकीय चर्चा ठरणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.