PM Asha Yojana 2025: शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी योजना, जाणून घ्या महत्त्वाची माहिती

PM Asha Yojana 2025

PM Asha Yojana काय आहे?


PM Asha Yojana 2025 : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य बाजारभाव मिळावा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी ‘PM आशा योजना’ (Pradhan Mantri Asha Yojana) सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 2025-26 या आर्थिक वर्षापर्यंत या योजनेसाठी 35,000 कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्याची हमी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य बाजारभाव देईल आणि ग्राहकांसाठी जीवनावश्यक वस्तू किफायतशीर दरात उपलब्ध करून देईल. या योजनेद्वारे शेतकऱ्यांसाठी स्थिर आर्थिक लाभ मिळण्याची हमी सरकारने दिली आहे.

PM आशा योजनेची वैशिष्ट्ये

  1. किंमत समर्थन योजना (PSS):
  • शेतकऱ्यांकडून अधिसूचित कडधान्ये, तेलबिया याची खरेदी त्यांच्या राष्ट्रीय उत्पादनाच्या 25% पर्यंत केली जाईल.
  • उडीद आणि मसूर यांसारख्या पिकांसाठी 100% खरेदीची हमी दिली आहे.
  1. किंमत स्थिरीकरण निधी (PSF):
  • डाळी आणि कांद्याचा बफर स्टॉक तयार करण्यात येणार आहे, ज्यामुळे किमतीतील चढ-उतार टाळता येतील.
  • सट्टेबाजी आणि होर्डिंगवर नियंत्रण आणले जाईल.
  1. सरकारी हमी वाढ:
  • डाळी, तेलबिया खरेदीसाठी सरकारने हमी 45,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे.
  • NAFED च्या ई-समृद्धी पोर्टल आणि NCCF च्या ई-संयुक्ती पोर्टलद्वारे खरेदी केली जाईल.
  1. प्राइस डेफिसिट पेमेंट स्कीम (PDPS):
  • PDPS चा विस्तार 40% पर्यंत केला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना कापणीवेळी बाजारभावाच्या घसरणीचा फटका बसणार नाही.
  1. MIS योजनेचा विस्तार:
  • नाशवंत बागायती पिकांसाठी MIS अंतर्गत कव्हरेज 25% करण्यात आले आहे.

ग्राहकांसाठी लाभ


या योजनेंतर्गत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राहतील आणि वस्तू सहज उपलब्ध होतील. यामुळे ग्राहकांना महागाईच्या फटक्यापासून दिलासा मिळेल.
पिएम आशा योजना (PM Asha Yojana) शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार असून ग्राहकांनाही स्वस्त दरात वस्तू उपलब्ध करून देते. सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल.

Share This Article