PM Matru Vandana Yojana: महिलांसाठी जीवनदायी योजना
PM Matru Vandana Yojana Maharashtra Beneficiaries: गर्भवती व स्तनदा मातांचे आरोग्य सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणारी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात यशस्वीपणे कार्यरत आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत ३५ लाख २६ हजार २६५ महिलांना लाभ मिळाला आहे.
योजनेचा उद्देश:
महिलांना गरोदरपणात सकस आहार व आरोग्य सेवा मिळवून देणे, तसेच बाळंतपणातील कुपोषणाचा प्रभाव कमी करणे हा PM Matru Vandana योजनेचा मुख्य उद्देश आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे लाभ:
- पहिले अपत्य:
- पहिला हप्ता: गर्भधारणेच्या नोंदणीसाठी ३,००० रुपये.
- दुसरा हप्ता: बाळाच्या लसीकरणासाठी २,००० रुपये.
- दुसरे अपत्य (मुलगी):
- एकरकमी ६,००० रुपये.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी अर्ज कसा करावा?
- लाभार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्र किंवा अधिकृत पोर्टलवर नोंदणी करता येते.
- आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात मदत करतात.
- पात्र लाभार्थ्यांना PMMVY च्या माध्यमातून ऑनलाईन फॉर्म भरता येतो.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसाठी कोण पात्र आहेत?
- वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असलेल्या महिला.
- अनुसूचित जाती-जमातीतील महिला.
- दिव्यांग महिला (४०% किंवा अधिक).
- बीपीएल कार्डधारक.
- इ-श्रम कार्डधारक.
- मनरेगा जॉब कार्डधारक महिला.
- अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या.
महत्त्वाची आकडेवारी:
2024 पर्यंत, राज्यातील ३५ लाखांहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यामध्ये वर्ष २०२३-२४ मध्ये १,१९,८२८ महिलांचा समावेश आहे.
केंद्राच्या नवीन सुधारणा:
1 एप्रिल २०२२ पासून दुसऱ्या अपत्याच्या (मुलगी) जन्मासाठी देखील या योजनेचा लाभ दिला जात आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त पाऊल आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व योजनेची अधिक माहिती मिळवण्यासाठी शासकीय केंद्रांला भेट द्या.