Janani Suraksha Yojana Maharashtra सिझेरियन खर्चाची चिंता? जननी सुरक्षा योजना देत आहे मोठा दिलासा

Janani Suraksha Yojana Benefits

Janani Suraksha Yojana Maharashtra | गरजू गर्भवती महिलांसाठी मदतीचा हात

Janani Suraksha Yojana In Marathi : जननी सुरक्षा योजना ही गरीब आणि गरजू गर्भवती महिलांसाठी आधारवड ठरत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे सिझेरियन ऑपरेशनचा खर्च परवडत नसलेल्या कुटुंबांना या योजनेचा मोठा आधार मिळत आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत 2005-06 मध्ये सुरू झालेली ही योजना सुरुवातीला ग्रामीण भागापुरती मर्यादित होती. मात्र, आता शहरी भागातील महिलांनाही याचा लाभ मिळतो आहे.

कशा प्रकारे मिळतो लाभ?


या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा लागतो. आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील आदी माहिती दिल्यानंतर थेट ‘डीबीटी’ प्रणालीद्वारे गर्भवतीच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे आर्थिक मदतीचा संपूर्ण लाभ पारदर्शकपणे पोहोचतो.

योजनेचे उद्दिष्ट:

  • गरजू गर्भवती महिलांच्या सुरक्षित प्रसूतीचे प्रमाण वाढवणे
  • माता व बालमृत्यूदर कमी करणे
  • ग्रामीण व शहरी भागातील महिलांना आरोग्य सुविधा देणे

योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात?

  1. दारिद्र्यरेषेखालील महिला
  2. अनुसूचित जाती व जमातीतील गर्भवती महिला
  3. प्रसवपूर्व नोंदणी करताना वय किमान 19 वर्षे असणे आवश्यक
  4. योजनेचा लाभ दोन मुलांपर्यंतच मर्यादित

अर्ज कुठे करायचा?


सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा व नगरपालिका रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अर्ज करता येतो.

🔴 हेही वाचा 👉 गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य; असा करा अर्ज.

जननी सुरक्षा योजनेचा लाभ कसा होतोय?


“शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये प्रसूती झालेल्या महिलांसह घरी प्रसूती झालेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ देण्यात येतो. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळत आहे. मातांसह बाळांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाते.”
जर तुम्हाला जननी सुरक्षा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर आजच नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधा. ही योजना तुम्हाला आणि तुमच्या बाळाला आरोग्यदायी भवितव्याची हमी देते.

Share This Article