Happy New Year 2025 Celebration New Guidelines Maharashtra: नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होण्यास काहीच दिवस उरले आहेत. 31 डिसेंबरच्या रात्री हॉटेल्स आणि बारमध्ये नवं वर्ष साजरं करण्यासाठी अनेक लोकांनी प्लॅन बनवले असतील. परंतु, यंदा महाराष्ट्र सरकारने नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी काही महत्त्वाचे नियम केले आहेत. यामध्ये मद्यपानाच्या प्रमाणावर बंधन आणण्यात आले आहे.
नव्या नियमांनुसार, 31 डिसेंबरला हॉटेल किंवा बारमध्ये जाऊन मद्यपान करणाऱ्यांना फक्त चार पॅक दारू मिळणार आहे. यापेक्षा अधिक मद्याचे वितरण होणार नाही. हॉटेल असोसिएशनने यासंबंधीची माहिती दिली आहे. यामुळे, मद्यपान करणाऱ्यांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे, कारण प्रमाणाबाहेर मद्यपान केल्याने अपघात होण्याची शक्यता असते. अनेक वेळा लोक दारू पिऊन वाहन चालवताना अपघात होतात, हे लक्षात घेत राज्य सरकारने हे नवीन नियम आणले आहेत.
सर्व हॉटेल्स आणि बारसाठी सरकारने नवीन गाईडलाईन्स जारी केली आहेत. त्यानुसार, दारू देण्यापूर्वी ग्राहकाचे वय तपासणे अनिवार्य आहे. अल्पवयीन असलेल्या व्यक्तींना दारू देणे कायद्यानुसार गुन्हा आहे. याशिवाय, मद्यपान करणाऱ्यांना घरी सोडण्यासाठी चालकाची सोयही करण्यात आली आहे.
हॉटेल्स आणि बार 31 डिसेंबरच्या रात्री सकाळी पाच वाजेपर्यंत खुले राहतील. मात्र, यावेळी प्रत्येक ग्राहकावर दारूच्या प्रमाणाची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या उत्सवात सुरक्षितता आणि आनंदाचा योग्य समतोल राखणे आवश्यक आहे.