लाडकी बहीण योजनेसाठी शिक्षकांच्या पगारासाठीचा निधी वळविला? आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण Majhi Ladki Bahin Yojana New Update Today

Majhi Ladki Bahin Yojana New Update Today In Marathi

Majhi Ladki Bahin Yojana New Update Today: राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी सांगितले की २४ डिसेंबर २०२४ पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तीन-चार दिवसांत सर्व लाभार्थीं महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील.

लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण


लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर आरोप केले होते. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देत तटकरे म्हणाल्या की, माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mazi Ladki Bahin Yojana) इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही. सरकारने नागपूर अधिवेशनात मंजूर केलेल्या सव्वाशे कोटींच्या निधीतून हा हप्ता वितरित केला जात आहे.

6वा हप्ता मिळण्यासाठीची प्रतीक्षा संपली


लाडकी बहीण योजनेतील (Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांना 6व्या हप्त्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र, अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की आचारसंहिता लागू झाल्याने निधी मंजुरीला उशीर झाला. आता हा अडथळा दूर झाल्यामुळे 6वा हप्ता महिला लाभार्थींना वेळेत मिळत आहे. आणि पुढचा हफ्ताही वेळेत मिळेल.

शिक्षकांच्या पगारासाठीचा निधी वळविला?


अदिती तटकरे यांनी शिक्षकांच्या पगारासाठीचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविला जात असल्याचा आरोप फेटाळला. त्यांनी स्पष्ट केले की, या योजनेचा इतर विभागांशी कोणताही आर्थिक संबंध नाही.

महत्वाचे मुद्दे:

  • 6वा हप्ता वाटपाची सुरुवात: २४ डिसेंबरपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात 6व्या हफ्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात.
  • निधीविषयक आरोप फेटाळले: इतर विभागाचा निधी वळवला नसल्याचे स्पष्टीकरण.
  • सर्व लाभार्थींचा समावेश: तीन ते चार दिवसांत सर्व लाभार्थींच्या खात्यात पैसे पोहोचण्याची खात्री.
Share This Article