PM Kisan Yojana 19th Installment Ineligible Farmers: भारत सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते, जी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. सध्या या योजनेचा 19 वा हप्ता लवकरच जारी होणार आहे. मात्र, काही शेतकऱ्यांना या 19 व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. जाणून घ्या कोणत्या चुकांमुळे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या हफ्त्यापासून वंचित राहावे लागू शकते आणि आपल्या खात्यात हफ्त्याचे पैसे वेळेवर जमा होण्यासाठी काय करायचे…
पिएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याची अपेक्षित तारीख:
पिएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. परंतु मागील हप्त्यांच्या आधारावर, जानेवारी 2024 मध्ये 19 वा हप्ता जारी होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांचा हप्ता थांबण्याची कारणे:
- फॉर्ममधील त्रुटी:
- शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये चूक असल्यास हप्ता अडकू शकतो. फॉर्ममधील सर्व माहिती पुन्हा तपासा.
- बँक खाते माहिती चुकीची:
- चुकीची बँक खाते माहिती किंवा डीबीटी (डायरेक्ट बँक ट्रान्सफर) सेवा अॅक्टिव्ह नसल्यास तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.
- ई-केवायसी पूर्ण केलेली नसणे:
- ई-केवायसी न केल्यामुळे हप्ता थांबतो. ई-केवायसी pmkisan.gov.in वरून किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन पूर्ण करा.
- आधार कार्ड लिंक नसणे:
- आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करणे अनिवार्य आहे. हे तातडीने पूर्ण करा.
- जमीन पडताळणी अपूर्ण:
- पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी जमिनीची पडताळणी करणे बंधनकारक आहे. हे काम लवकर पूर्ण करा.
शेतकऱ्यांसाठी महत्वाचे:
सरकारने जारी केलेल्या या सूचनांचा पालन केल्यास पिएम किसान योजनेचा हप्ता जमा होण्यात कोणतीही अडचण येणार नाही. शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जामधील त्रुटी दूर करून, बँक खाते अपडेट करून आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून 19 व्या हप्त्याचा लाभ घ्यावा.