माझी लाडकी बहीण योजनेसाठीची नोंदणी पुन्हा सुरू होणार? जाणून घ्या ताजी अपडेट Majhi Ladki Bahin Yojana Registration Update

Majhi Ladki Bahin Yojana Registration Update

Majhi Ladki Bahin Yojana Registration Update: महाराष्ट्र सरकारने गरजू महिलांसाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) यशस्वीरित्या राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. राज्यातील महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी या योजनेबाबत काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया अजून सुरू


माझी लाडकी बहीण योजनेचा (Majhi Ladki Bahin Yojana) डिसेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अजून सुरू असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केले. पहिल्या टप्प्यात 67,92,292 महिलांच्या खात्यात हप्ता जमा करण्यात आला आहे. उर्वरित पात्र महिलांच्या खात्यात हा हप्ता टप्प्याटप्प्याने जमा केला जाणार आहे. आणि 31 डिसेंबर पर्यंत राज्यातील सर्व पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचे पैसे जमा होतील असे त्यांनी सांगितले.

नव्याने बँक आधार-लिंक केलेल्या महिलांसाठी विशेष प्रयत्न


ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्यांशी लिंक नव्हते त्यामुळे महिलांच्या खात्यात यापूर्वी पैसे जमा होऊ शकले नव्हते अशा 12 लाख महिलांच्या खात्यांत देखील हप्ता जमा करण्याचे काम सुरू आहे.

लाडकी बहीण योजनेसाठीची नोंदणी पुन्हा सुरू होणार?


योजनेच्या रकमेचा हप्ता ₹1500 वरून ₹2100 पर्यंत वाढवण्याबाबत विचार केला जात आहे. राज्य सरकारच्या आगामी बजेट अधिवेशनात हा प्रस्ताव सादर होईल, त्यानंतर लाडकी बहिण योजनेसाठी पुन्हा नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे योजनेचे लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी ही एक चांगली संधी ठरू शकते.

अर्जासाठी पात्रता

  • वार्षिक उत्पन्न: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
  • आर्थिक मदत: पात्र महिलांना 1 जुलैपासून ₹1500 प्रतिमाह देण्यात येत आहेत.
  • शेवटची तारीख: योजनेसाठी मागील नोंदणी 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरु होती.

आचारसंहितेमुळे उशीर


ऑक्टोबर महिन्यात लागू झालेल्या आचार संहितेमुळे डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरण प्रक्रियेला उशीर झाला होता. मात्र, आता हा अडथळा दूर केला गेला आहे आणि प्रक्रिया वेगाने सुरू आहे.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) गरजू महिलांना आर्थिक स्थैर्य देण्यासह त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरत आहे. राज्य सरकार योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Share This Article