Majhi Ladki Bahin Yojana 2100 Rupees Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी या योजनेसंदर्भात माहिती देत गोंधळ दूर केला आहे.
डिसेंबर महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mazi Ladki Bahin Yojana) योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व पात्र महिलांना हा निधी वितरित केला जाईल.
2100 रुपये कधीपासून मिळणार?
महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत विचारले असता आदिती तटकरे म्हणाल्या की, पुढील अर्थसंकल्पात हा प्रस्ताव सादर करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. आणि पुढील अर्थसंकल्पानंतर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा 2100 रुपये देण्यात येतील.
नवीन रजिस्ट्रेशनसंदर्भात निर्णय प्रलंबित
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन रजिस्ट्रेशन सध्या स्थगित आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत सुमारे 2.5 कोटी महिलांनी नोंदणी केली आहे. नवीन रजिस्ट्रेशनबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
आधार सिडिंगमुळे लाभ थांबलेल्या महिलांसाठी खास उपाययोजना
ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत पण आधार सिडिंग समस्येमुळे लाभ मिळालेला नाही, त्या महिलांसाठी विशेष उपाययोजना करून त्यांची आधार सिडिंगची समस्या सोडवून तातडीने त्यांच्या खात्यात डिसेंबरच्या हफ्त्याचे 1500 रुपये जमा केले जात आहेत.
सरसकट पडताळणीसाठी कोणताही निर्णय नाही
महिलांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या आधारे अर्जांची तपासणी केली जाईल. मात्र, सरसकट अर्जांची पडताळणी करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. अस मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.
- आर्थिक मदतीत वाढ: सध्याचे 1500 रुपये लवकरच 2100 रुपये होण्याची शक्यता.
- पात्र महिलांना नियमित निधी मिळण्याची हमी.
- आधार सिडिंगमुळे लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यावर भर.
महिला आणि बालविकास विभागाच्या या उपक्रमामुळे महिलांना आर्थिक पाठबळ मिळत असून त्यांचे सक्षमीकरण वाढणार आहे. लाडकी बहीण योजनेतील बदल आणि निर्णयांसाठी महिलांना सरकारच्या पुढील घोषणांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.