Swamitva Yojana Property Rights Marathi: केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत गावांतील मालमत्तांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून नागरिकांना मालकी हक्काचे प्रॉपर्टी कार्ड वितरित केले जात आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे मालमत्ताधारकांना त्यांच्या जमिनीच्या हक्काचा अधिकृत पुरावा मिळत आहे.
स्वामित्व योजनेचा उद्देश
1958 पासून सुरू झालेल्या या योजनेद्वारे, गावांतील मिळकतींचे अचूक सीमांकन व नोंदणी केली जात आहे. यामुळे मालमत्तेवरील वाद मिटतील, तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या मालकी हक्काच्या जागेवर कर्ज घेणे शक्य होईल. शिवाय, ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढीस लागणार आहे.
प्रॉपर्टी कार्डचे फायदे
- मालमत्तेवरील कर्जासाठी अधिकृत पुरावा उपलब्ध.
- मालमत्तेवरील वाद व तंटे कमी होणार.
- ग्रामपंचायतींना कर आकारणी सुलभ होणार.
- नागरिकांची आर्थिक पत वाढणार.
महत्त्वाचे पाऊल: GIS नकाशांचा उपयोग
ग्रामविकास नियोजनासाठी GIS नकाशांचा उपयोग केला जात आहे. ग्रामपंचायतींच्या विकास आराखड्यात यामुळे सुधारणा होणार आहे.
विशेष उपक्रम
27 डिसेंबर रोजी विशेष कार्यक्रमांतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण व योजनेची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा व त्यांच्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळवावे.
जागेचा हक्क अधिकृतपणे मिळवा
स्वामित्व योजना (Swamitva Yojana) केवळ मालकी हक्क देत नाही, तर गावांच्या आर्थिक प्रगतीलाही चालना देत आहे. प्रॉपर्टी कार्ड हे गावातील विकासासाठी एक महत्त्वाचे साधन ठरले आहे.