पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांचा १२ हजार रुपयांचा निधी होणार १५ हजार, लवकरच निर्णयाची शक्यता PM Kisan Yojana and Namo Shetkari Yojana Farmers Funding Increase 12k To 15k

PM Kisan Yojana and Namo Shetkari Yojana Farmers Funding Increase 12k To 15k

PM Kisan Yojana and Namo Shetkari Yojana Farmers Funding Increase 12k To 15k: शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त योजनांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना सध्या वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. याशिवाय राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतूनही (Namo Shetkari Yojana Maharashtra) ६ हजार रुपये दिले जातात. मात्र, आता या एकूण १२ हजार रुपयांच्या निधीत वाढ करून १५ हजार रुपये करण्याचा विचार सुरू आहे.

पुण्यात शेतकरी सन्मान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे पाऊल उचलले जाणार असून लवकरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

शाश्वत शेतीसाठी राज्य सरकारचे प्रयत्न


राज्य सरकार पारंपरिक शेतीला प्रोत्साहन देऊन सेंद्रिय शेतीसाठी मोठा कार्यक्रम हाती घेत आहे. आगामी तीन वर्षांत २५ लाख हेक्टर शेती सेंद्रिय शेतीखाली आणण्याचा उद्देश आहे. याशिवाय, रसायनांच्या वापराला मर्यादा घालून नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी विविध मोहिमा राबवल्या जाणार आहेत.

यांत्रिकीकरणासाठी खास योजना


लहान शेतकऱ्यांना शेती यांत्रिकीकरण सुलभ व्हावे यासाठी राज्य सरकारकडून अनेक योजना आखण्यात येत आहेत. या योजनांमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात शेती यंत्रसामग्री उपलब्ध होईल.


पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) आणि नमो शेतकरी सन्मान निधी (Namo Shetkari Yojana) योजनांच्या निधी वाढीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिरता आणि शेती उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे”.

🔴 हेही वाचा 👉 2025 मध्ये शेतकऱ्यांना मिळणार दोन मोठ्या भेटी! पुढच्या हप्त्यासह रकमेत वाढ शक्य.

Share This Article