Majhi Ladki Bahin Yojana Anganwadi Sevika Pending Payment: जुलै 2024 मध्ये राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून दरमहा 1500 रुपये प्रमाणे जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांचे हफ्ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. मात्र, ही योजना यशस्वीपणे राबवणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मात्र दिलेलं वचन सरकार विसरलं आहे.
लाडकी बहिण योजनेच्या (Majhi Ladki Bahin Yojana) लाखो लाभार्थ्यांना सहावा हप्ता प्राप्त होऊन, त्यांच्या खात्यात आत्तापर्यंत एकूण 9000 रुपये पोहोचले आहेत. तथापि, योजनेचे फॉर्म भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मानधन स्वरूपात देय असलेले प्रति फॉर्म 50 रुपये अजून मिळालेले नाहीत. योजनेचे फॉर्म भरण्यासाठी दिवस रात्र एक करणाऱ्या अंगणवाडी सेविकांसाठी ही गोष्ट खूपच निराशाजनक ठरली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरू झाल्यानंतर, राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना प्रत्येक फॉर्म भरण्याबद्दल 50 रुपये दिले जाणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. अंगणवाडी सेविकांनी दिवसरात्र मेहनत घेऊन करोडो महिलांचे फॉर्म भरले, ज्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 34 लाखांवर पोहोचली. यामुळे सरकारची ही योजना यशस्वी झाली आणि महायुती सरकारला एक प्रकारे सत्ता मिळवण्यास मदत झाली.
पण, या योजनेचे फॉर्म भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अजूनही आश्वासनाप्रमाणे पैसे मिळालेले नाहीत. योजनेच्या यशस्वीतेसाठी प्रचंड परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांसाठी ही अपमानकारक वागणूक आहे. काही अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या भरलेल्या फॉर्मच्या संख्येवर आक्षेप घेतला आहे, कारण प्रत्यक्षात त्यांनि भरलेले फॉर्म आणि सरकारी अधिकृत आकडेवारीमध्ये फरक आढळून आला आहे.
आता अंगणवाडी सेविकांना आशा आहे की सरकार नवीन वर्षात त्यांच्या कष्टांचा योग्य मोबदला देईल, यामुळे सरकारच्या निर्णयाकडे अंगणवाडी सेविकांच लक्ष लागलं आहे.
योजना यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मेहनत अत्यंत महत्त्वाची आहे, परंतु सरकारच्या दुर्लक्षामुळे अंगणवाडी सेविकांना त्यांच्या हक्काच्या पैश्यासाठी वाट पाहावी लागत आहे. सरकारने लवकरात लवकर त्यांच्या कष्टांचा योग्य मोबदला दिला पाहिजे, अशी सर्व अंगणवाडी अंगणवाडी सेविकांची एकच मागणी आहे.