६७ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा, नवीन नोंदणी बाबत अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण Majhi Ladki Bahin Yojana New Registration Aditi Tatkare Explanation

Majhi Ladki Bahin Yojana New Registration Aditi Tatkare Explanation

Majhi Ladki Bahin Yojana New Registration Aditi Tatkare Explanation: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या सहाव्या हप्त्याचे वितरण कालपासून सुरु झाले आहे. यावेळी २४ डिसेंबरपासून राज्यातील २ कोटी ३४ लाख महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा केला जात आहे. आधार सीडींग प्रक्रिया पूर्ण झालेल्या १२ लाख महिलांना देखील याचा लाभ मिळणार आहे.


महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “पहिल्या दिवशी ६७,९२,२९२ महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत उर्वरित महिलांना देखील सन्मान निधी मिळेल.” ह्या हप्त्याच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना आर्थिक मदत देत आहे, ज्याचा उपयोग महिला आपल्या घरच्या गरजा आणि उपजीविकेसाठी करू शकतात.

लाडकी बहीण योजना नवीन नोंदणीचे स्पष्टीकरण

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी लाडकी बहीण योजनेच्या नवीन नोंदणीच्या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार, १५ ऑक्टोबर रोजी नोंदणीची अंतिम मुदत होती आणि त्यावेळी २.५ कोटींहून अधिक महिलांची नोंदणी झाली होती. मात्र, सध्या नवीन नोंदणीसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी अर्थसंकल्पात या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी मदत मिळते. या योजनेअंतर्गत महिलांना सन्मान निधी दिला जातो, ज्याचा उपयोग त्या आपल्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी करु शकतात.


अंगणवाडी सेविकांच्या समस्येची माहिती


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज (Majhi Ladki Bahin Yojana Form) भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रती फॉर्म भरण्यासाठी ५० रुपये मानधन देण्यात येणार होते, अंगणवाडी सेविकांना ते अजूनही मिळालेले नाही. या संदर्भात लवकरच अंगणवाडी सेविकांच्या हितासाठी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे.


पुढील काही दिवसांत निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याचा लाभ मिळेल असे आदिती तटकरे म्हणाल्या.

Share This Article