Majhi Ladki Bahin Yojana PM Awas Yojana: राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप झाल्यानंतर आता सरकार अॅक्टिव्ह मोडमध्ये आलं आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बोलताना लाडक्या बहिणींसाठी आणि बेघरांसाठी मोठी घोषणा केली आहे.
लाडकी बहीण योजनेचा पुढचा टप्पा
राज्य सरकारने (Mazi Ladki Bahin Yojana) लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली असून आतापर्यंत या योजनेच्या पाच हप्त्यांचे पैसे लाभार्थींच्या खात्यात जमा झाले आहेत. योजनेनुसार पात्र महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला ₹1,500 जमा केले जात आहेत. निवडणुकीत महायुतीने महिलांना ₹2,100 दरमहा देण्याचं आश्वासन दिलं होतं.
सत्तेत आल्यानंतर आता या योजनेतील रक्कम वाढीचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. डिसेंबरचा हप्ताही लवकरच जमा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
लाडक्या बहिणींना केंद्र सरकारचं मोठं गिफ्ट
Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra Center Announces Big Gift: फक्त राज्य सरकारच नाही, तर केंद्र सरकारनेही लाडक्या बहिणींना दिलासा देत (PM Awas Yojana) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महाराष्ट्रासाठी वीस लाख घरांना मंजुरी दिली आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाची माहिती दिली.
लाडक्या बहिणींसाठी हक्काचं घर
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळालेली घरांची मंजुरी ही बेघरांना दिलासा देणारी ठरणार आहे. याचा थेट फायदा शेतकरी कुटुंबांना आणि महिलांना मिळणार आहे. फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, लाडक्या बहिणींना आर्थिक मदतीसोबतच हक्काचं घर मिळवून देण्याचा सरकारचा प्राधान्यक्रम आहे.
महिला सक्षमीकरणाला चालना
राज्य आणि केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना आर्थिक स्थैर्याबरोबरच घराचा हक्क मिळेल. ही योजना महिलांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
महायुती सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. लाडकी बहीण योजना आर्थिक मदतीसह महिलांना स्वावलंबी बनवत आहे. आता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाडक्या बहिणींसाठी वीस लाख घरांना मंजुरी मिळाल्याने महिलांना हक्काचं घरही मिळणार आहे.
राज्य आणि केंद्र सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमुळे महिलांसाठी नवी स्वप्नपूर्तीची दारे उघडली जात आहेत. लाडक्या बहिणींसाठी पुढील निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.