सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सनी लिओनीचे नाव, योजना व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह Sunny Leone Chhattisgarh Mahtari Vandana Yojana

Sunny Leone Chhattisgarh Mahtari Vandana Yojana Controversy

Sunny Leone Chhattisgarh Mahtari Vandana Yojana Controversy: छत्तीसगडच्या महतरी वंदना योजनेंतर्गत सनी लिओनीचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत दिसल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या योजनेद्वारे विवाहित महिलांना दरमहा 1,000 रुपये दिले जातात. मात्र, बस्तर जिल्ह्यातील एका फाईलमध्ये सनी लिओनीचे नाव लाभार्थी म्हणून नोंदवले गेले असून, तिच्या पतीच्या नावाची नोंद ‘जॉनी सिन्स’ अशी आहे. यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कसे उघडकीस आले प्रकरण?

छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील तलूर सेक्टरमध्ये ही घटना घडली. एका अंगणवाडी स्तरावर अर्ज दाखल करताना, लाभार्थ्याचे नाव सनी लिओनी आणि पतीचे नाव जॉनी सिन्स दाखवण्यात आले. या अर्जाची तपासणी दोन अधिकाऱ्यांनी केली असून, अर्ज मंजूर करण्यात आला. यानंतर मार्च आणि डिसेंबर महिन्याचे दोन हफ्ते देखील जमा केले गेला.

बस्तर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रकरणाची चौकशी करत असून, फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

महतरी वंदना योजना काय आहे?

महतरी वंदना योजना ही छत्तीसगड सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत:

  • लाभार्थी: 21 वर्षांवरील विवाहित, विधवा आणि घटस्फोटित महिला.
  • लाभ: दरमहा 1,000 रुपये.
  • नोंदणी सुरूवात: 5 फेब्रुवारी 2024.
  • पहिला हप्ता: 10 मार्च रोजी जारी.

सध्या 70 लाखांहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे, आणि 5,000 कोटींहून अधिक रक्कम बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे.

योजना व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह

सनी लिओनीसारख्या नावांचा वापर करून सरकारी योजनांमध्ये फसवणूक होत असल्याचे हे प्रकरण दाखवते. सरकार आणि प्रशासनाला यापुढे योजनेच्या अंमलबजावणीत अधिक दक्षता बाळगण्याची गरज आहे. सरकारच्या या योजनेला पुन्हा विश्वासार्हतेकडे नेण्यासाठी कठोर उपाययोजना अपेक्षित आहेत.

Share This Article