PMAY 2.0: स्वतःच्या घराच स्वप्न पूर्ण करण्याची संधी! अर्ज प्रक्रिया, कागदपत्रं आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या

PMAY 2.0 Scheme Apply Documents Details

PMAY 2.0 Scheme Apply Documents Details

PMAY 2.0 Scheme: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने पीएम आवास योजना 2.0 पुन्हा सुरू केली आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), कमी उत्पन्न गट (LIG), मध्यमवर्ग (MIG), आणि इतर गरजू कुटुंबांना घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत देणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात लाखो लाभार्थ्यांना यशस्वीरीत्या घरे वितरित करण्यात आली आहेत, आणि आता दुसऱ्या टप्प्यातही सरकारकडून मोठ्या प्रमाणावर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पीएम आवास योजनेचे फायदे आणि प्रकार

चार श्रेणीत लाभ:

PMAY 2.0 अंतर्गत चार श्रेणींमध्ये लाभ उपलब्ध होणार आहेत:

  1. BLC (Beneficiary Led Construction):
    • पात्र लाभार्थ्यांना 45 चौरस मीटरपर्यंत घर बांधण्यासाठी ₹2.25 लाख केंद्र सरकारकडून आर्थिक मदत.
    • पात्रता: वार्षिक उत्पन्न ₹3 लाखांच्या आत.
  2. AHP (Affordable Housing Partnership):
    • खासगी किंवा सरकारी पातळीवर किफायतशीर दरात घरे तयार केली जातील.
    • आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS): केंद्र सरकार ₹2.25 लाख व राज्य सरकार ₹50,000 देईल.
    • कमी उत्पन्न गटासाठी (LIG): वार्षिक उत्पन्न ₹3-6 लाख.
  3. ARH (Affordable Rental Housing):
    • भाडेतत्त्वावर घर मिळवण्यासाठी ही योजना उपयुक्त आहे, ज्यांच्याकडे घर खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत.
  4. ISS (Interest Rate Subsidy):
    • 35 लाखांपर्यंतच्या घरांसाठी ₹25 लाख कर्जावर व्याज सवलत.
    • 1.80 लाखांपर्यंत सबसिडीचा लाभ EWS, LIG, आणि MIG गटांना मिळू शकतो.

अर्ज करण्याची प्रक्रिया

  1. PMAY-U 2.0 संकेतस्थळाला भेट द्या.
  2. “PMAY-U 2.0 साठी निवेदन” पर्याय निवडा.
  3. आवश्यक माहिती भरा: वार्षिक उत्पन्न, पत्ता, आणि इतर तपशील.
  4. आधार वेरिफिकेशन: OTP च्या साहाय्याने आधार वेरीफाय करा.
  5. कागदपत्रं अपलोड करा आणि अर्ज सादर करा.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रं:

  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • ओळखपत्र (PAN कार्ड, मतदार ओळखपत्र)
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक खाते माहिती

PMAY 2.0: तुमचं घराचं स्वप्न पूर्ण करा

पंतप्रधान आवास योजना 2.0 अंतर्गत घर खरेदी किंवा बांधकामासाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी आजच अर्ज करा. ही योजना घर खरेदीचं स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आहे.

महत्त्वाची टीप:

अर्ज करण्याआधी तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करा. तसेच, अर्जात योग्य आणि संपूर्ण माहिती भरणं आवश्यक आहे.

तुमचं घराचं स्वप्न आजच साकार करा! PMAY 2.0 च्या माध्यमातून हक्काच्या घरांचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करण्याची संधी गमावू नका.

Share This Article