Majhi Ladki Bahin Yojana December Payment Update: महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना एक अत्यंत महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना ₹1,500 इतकी आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत जवळपास ₹7,500 रुपये पात्र लाभार्थींच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार?
नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर लगेचच बँक खात्यांमध्ये वर्ग केला जाईल. 21 डिसेंबर रोजी अधिवेशन संपल्यामुळे आता कोणत्याही क्षणी या योजनेचा हप्ता लाभार्थींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
आधार लिंक करणे गरजेचे:
ज्यांनी (Mazi Ladki Bahin Yojana) माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले आहेत, परंतु त्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही, त्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक केले आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे. तपासण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
- UIDAI संकेतस्थळावर भेट द्या.
- आधार लिंकिंग स्टेटस वर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका.
- ओटीपीच्या साह्याने लॉगिन करून स्टेटस तपासा.
जर खाते आधारशी लिंक नसेल, तर तुमच्या बँकेत भेट देऊन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा.
निकषांमध्ये बदल होण्याची शक्यता:
सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांवर पुनर्विचार सुरू आहे. काही ठिकाणी निकषांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, जसे की:
- एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे.
- आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिलांनाही लाभ मिळाला आहे.
परंतु अद्याप निकषांमध्ये कोणताही बदल झाला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणत्याही क्षणी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या बँक खात्याची माहिती अपडेट ठेवणे आणि आधारशी लिंक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.