Pink E Rickshaw Yojana Maharashtra:
Pink E Rickshaw Yojana Maharashtra Priority Given To Majhi Ladki Bahin Yojana Beneficiaries: तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा आणण्याचा आणि तुम्हाला सुरक्षित व स्वावलंबी बनवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न (Pink E Rickshaw Yojana) ‘पिंक ई-रिक्षा’ योजनेतून दिसून येतो. महिलांसाठी रोजगाराच्या संधी तयार करत, त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. विशेषतः लाडल्या बहिणींना या योजनेचा फायदा होईल, कारण यामध्ये दारिद्ररेषेखालील, विधवा आणि घटस्फोटित महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे.
योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्यांवर एक नजर:
आर्थिक सहाय्य आणि कर्ज सुविधा:
पिंक ई-रिक्षा योजनेत महिलांना ई-रिक्षा खरेदीसाठी ७०% कर्ज बँकांमार्फत मिळवता येईल. २०% राज्य सरकार कडून आर्थिक सहाय्य दिले जाईल, आणि तुम्हाला फक्त १०% रक्कम भरावी लागेल.
प्राधान्य:
या योजनेमध्ये लाडल्या बहिणींना विशेष प्राधान्य दिले जाईल. तसेच, दारिद्ररेषेखालील, विधवा आणि घटस्फोटित महिलांना प्राथमिकता दिली जाईल, जेणेकरून त्यांना स्वावलंबी बनू रोजगार मिळवण्याची संधी मिळेल.
पात्रता:- वय: २० ते ४० वर्ष
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांच्या आत
- बँक खाते असणे आवश्यक
महिलांसाठी ही योजना विशेषतः एक मोठी संधी आहे, जी तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणेल.
कर्ज परतफेडीच्या अटी:
योजनेतील कर्जाची परतफेड ५ वर्षांच्या कालावधीत करता येईल, ज्यामुळे तुमच्यावर आर्थिक भार कमी येईल.
आवश्यक कागदपत्रे:
- मतदान ओळखपत्र
- आधारकार्ड आणि पॅनकार्ड
- डोमिसाइल प्रमाणपत्र किंवा १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड
- उत्पन्न दाखला
- पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
- बँक खाते पुस्तक
- अटी व शर्तींचे पालन करण्याचे हमीपत्र
राज्य सरकारच्या या योजनेमुळे लाडक्या बहिणींना एक नवा आणि सुरक्षित रोजगार मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सशक्त करण्याचा राज्य सरकारचा उद्देश्य आहे. (Pink E Rickshaw Yojana) पिंक ई-रिक्षा योजना महिलांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकते, त्यामुळे तुमच्यासाठी ही योजना एक उपयुक्त आणि फायदेशीर संधी ठरू शकते.
🔴 हेही वाचा 👉 डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा.